मनोज जरांगे पाटील

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशातच आता जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलाय. त्यामुळे डॉक्टरांचं देखील टेन्शन वाढलं आहे.

शरीरावर परिणाम

पाण्याचा देखील त्याग केल्याने जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. अशक्तपणा आल्याने ग्रामस्थांनी त्याला पाणी पिण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर त्यांनी घोटभर पाणी पिलं. मात्र, तुम्हाला माहिती का? पाणी पिणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?

हृद्यगती

पाणी न पिल्याने ब्लड प्रेशर कमी होतं. त्यामुळे अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच हृद्यगती देखील मंदावते. पाण्याच्या कमतरतेमुळे सुरुवातीला किडनीवर परिणाम होतो.

किडनी

किडनीला धोका निर्माण होत असताना मेंदूची कार्यक्षमता देखील कमी होते. त्यामुळे शुद्ध हरवण्याची शक्यता असते. हळूहळू संपूर्ण शरीरावर परिणाम होत असल्याचं दिसून येतं.

त्वचेवर परिणाम

पाणी पिणं अचानक बंद केल्याने त्वचेला खाज सुटते आणि काही वेळा त्वचेतून बाहेरचा थर निघू लागतो.

मानसिक परिणाम

शरिरात पाण्याची कमरता असल्याने मानसिक परिणाम देखील दिसतो. असहाय्य वेदना होतात आणि मानसिक ताकद खचते.

किती पाणी प्यावं?

शरीर योग्य पद्धतीने काम करण्यासाठी आणि डिटॉक्सिफाय राहण्यासाठी दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी पोटात जाणं आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story