US चे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी विमानतळावर

बोलणारी ती चिमुकली कोण?

दिल्ली होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन भारतात आले आहेत. यावेळी विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं.

जो बायडेन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एक चिमुकलीही उपस्थिती होती. त्या चिमुकलीशी बोलताना जो बायडेन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

12 वर्षांच्या या चिमुकलीचं नाव माया असून ती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांची कन्या आहे. ती खास बायडेन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आली होती.

गार्सेट्टी यांची मुलगी माया प्रसिद्धीच्या झोतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ती अनेक ठिकाणी दिसून आली आहे.

ज्यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून गार्सेटी यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी माया हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या फोटोमध्ये माया हिब्रू बायबल हातात धरुन होती. याच बायबलवर गार्सेटी यांनी शपथ घेतली होती.

VIEW ALL

Read Next Story