Sexual Health

शारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद का होतात?

जेव्हा दोन जीव आपसात इंटीमेट होतात तेव्हा त्यांच्या मनात अनेक विचार सुरु असतात. शारीरिक संबंध ठेवताना दोन शरीरासोबत दोन भावनाची देवाणघेवाण होते.

आजही सेक्सबद्दल बोलताना किंवा त्याबद्दलच्या प्रश्नांवर मोकळेपणे चर्चा होत नाही. अशात अनेकांच्या मनात हा प्रश्न पडतो की सेक्स करताना महिलांचे डोळे का बंद होतात.

एका रिसर्चनुसार असं लक्षात आलं आहे की, ज्याप्रमाणे शिंकताना आपले डोळे बंद होतात. त्यावर आपलं नियंत्रण राहत नाही. तसंच सेक्स दरम्यान महिलांना परमोच्च आनंद मिळत असताना त्यांचे डोळे आपसूक बंद होतात.

त्याशिवाय रिसर्चनुसार सेक्स दरम्यान ग्लँडमध्ये तरल पदार्थाचा स्त्राव होतो. ज्यामुळे मेंदूला डोळे बंद करण्याचा मेसेज पाठवला जातो.

एका सर्व्हेनुसार असंही दिसून आलं की, एखादी महिला शारीरिक संबंधादरम्यान तिचे डोळे बंद करते म्हणजे ती सेक्सचा पूर्ण आनंद घेत आहे.

असं म्हणतात की, डोळ्यांचा थेट संबंध हा मेंदूशी आहे. डोळे उघडे राहिले तर महिलांचं पार्टनरवरील लक्ष विचलीत होतं. शिवाय क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यास महिलांना अडथळा येतो.

सेक्स दरम्या कपल्स इंटीमसी आणि केमिस्ट्रीला एन्जॉय करत असतात. अशावेळी त्यांना सर्वात सुरक्षित वाटतं असतं, त्यामुळे त्या डोळे बंद करुन घेतात.

असं म्हणतात की, एकाग्रता ठेवण्यासाठी महिला सेक्स करताना डोळे बंद ठेवतात.

याशिवाय महिला लाज, असहजता यामुळेही सेक्स दरम्यान डोळे बंद ठेवतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story