100 रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात?

100 रुपयांची नोट

100 रुपयांची नोट या न त्या कारणानं आपल्या वापरात येतेच. ही नोट व्यवस्थित पाहिली असता त्यामध्ये अनेक बारकावे पाहायला मिळतात.

आकर्षक बाब

आकर्षक बाब म्हणजे याच नोटेवर अनेक भाषा लिहिल्याचंही पाहायला मिळतं, एखाद्या ऐतिहासिक वास्तूचं चित्रही तिथं नजरेत येतं. काही अंदाज आहे 100 रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिल्या आहेत?

प्रतीक

RBI च्या माहितीनुसार 100 रुपयांच्या नोटेवर 15 भाषा लिहिल्या आहेत. देशात अनेक भाषा प्रचलित असल्यामुळं इथंही त्यांचं प्रतीक पाहायला मिळतं.

माहिती

प्रत्येक प्रांतातील नागरिकांसाठी नोटेवर इतक्या भाषांमध्ये रुपयांची माहिती लिहिल्याचं आढळतं. प्रत्येक भाषा ही तितकीच महत्त्वाती असून, तिचं प्रतिनिधित्वं म्हणून त्यांना नोटेवर स्थान देण्यात आलं आहे.

भाषा

हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, कन्नड, ओडिया, गुरुमुखी, बंगाली, उर्दू, मराठी या आणि अशा इतरही भाषांमध्ये त्या नोटेची रक्कम लिहिलेली असते.

कमाल!

फक्त 100 च नव्हे, तर 10, 20, 50 आणि 500 रुपयांच्या नोटेवरही या भाषा लिहिल्याचं आढळतं, आहे की नाही कमाल?

VIEW ALL

Read Next Story