रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार?

सणासुदीचे दिवस जवळ

सराफा बाजारात सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच सोनं-चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहेत. 3 जुलै 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 72,390 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम अर्थात प्रति तोळा 66360 रुपयांवर पोहोचले आहेत.

शहरांमधील दर

सोन्याच्या खरेदीच्या विचारात असाल, तर देशाच्या प्रमुख शहरांमधील दर पुढीलप्रमाणे... दिल्ली- 24 कॅरेट सोनं 72,530 रुपये; 22 कॅरेट सोनं 66,500 रुपये प्रतितोळा.

मुंबईतील दर

मुंबई- 24 कॅरेट सोनं 72,390 रुपये प्रतितोळा; 22 कॅरेट सोनं 66,360 रुपये प्रतितोळा. चेन्नई- 24 कॅरेट सोनं 72,530 रुपये प्रतितोळा; 22 कॅरेट सोनं 66,500 रुपये प्रतितोळा.

कोलकाता येथील दर

कोलकाता- 24 कॅरेट सोनं 72,390 रुपये प्रतितोळा; 22 कॅरेट सोनं 66,360 रुपये प्रतितोळा. हैदराबाद- 24 कॅरेट सोनं 72,390 रुपये प्रतितोळा; 22 कॅरेट सोनं 66360 रुपये प्रतितोळा.

चांदीचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) च्या वायदा बाजारात चांदीचे दर 641 रुपयांनी वाढून 88,523 रुपये प्रति किलोग्राम रुपयांवर पोहोचले आहेत.

सातत्यानं होणारे बदल.

आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याचे दर एका मर्यादीत प्रमाणात दिसत असून, चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळं सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आधी बदललेले दर पाहूनच घ्या.

VIEW ALL

Read Next Story