टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं.
टीम इंडियाचा विजयाचा उत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच आता वाईट बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आलीये.
वर्ल्ड कप स्टार संदीप पाटील यांनी अंशुमन गायकवाड यांच्यासाठी बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली आहे.
गायकवाड यांचे भारतीय क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन बीसीसीआयने साथ देयला हवी, असं संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.
अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
अंशुमन गायकवाड यांनी 1997 ते 1999 आणि पुन्हा 2000 या काळात टीम इंडियाचे प्रशिक्षक देखील होते.