चुकूनही 'या' 7 व्यक्तींच्या पाया पडू नका; होऊ शकतो मोठा अनर्थ

Swapnil Ghangale
Jan 04,2024

फार पूर्वीपासून परंपरा

सनातन धर्मात चरण स्पर्ध करुन मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची फार पूर्वीपासून परंपरा आहे.

काही लोकांच्या पाया पडू नये

मात्र शास्त्रानुसार काही लोकांच्या पाया पडता कामा नये. कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये जाणून घेऊयात...

संन्यासी व्यक्ती

संन्यासी व्यक्तीकडून पाया पडून घेऊ नये. संन्यासी व्यक्ती केवळ आपल्या गुरुंच्या पाया पडू शकतात असं शास्त्र सांगतं.

मामा-भाचा

भाचाने मामाच्या पाया पडू नये. श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यापासून हा नियम पाळला जातो.

झोपलेली व्यक्ती

झोपलेल्या किंवा पहुडलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये असं सांगितलं जातं.

जावई-सासरा

जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असं म्हणतात. शंकराने दक्षाची हत्या केल्यानंतरपासून हा नियम लागू असल्याचं म्हणतात.

अविवाहित मुली

अविवाहित मुली या देवीचं स्वरुप असतात. त्यामुळे अविवाहित मुलींकडून पाया पडून घेऊ नये असं म्हणतात.

मंदिरात कोणाच्याही पाया पडू नये

मंदिरामध्ये कोणाच्याही पाया पडता कामा नये. असं करणं हे मंदिरामधील देवाचा अपमान समजला जातो.

सामान्य संदर्भांवरून

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story