IAS ट्रेनी पदावर असणाऱ्यांना किती पगार मिळतो?

युपीएससी

दरवर्षी देशात लाखो इच्छुक उमेदवार आयएएस होण्यासाठीच्या स्वप्नपूर्तीसाठी युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेव आयोगाची परीक्षा देतात.

पूर्वपरीक्षा

पदवी शिक्षणानंतर या परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो. ज्यासाठी सर्वप्रथम इच्छुकांना पूर्वपरीक्षेचा टप्पा ओलांडावा लागतो.

परीक्षेचे सर्व टप्पे

अंतिम प्रकट मुलाखतीनं या परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण होतात. यामध्ये मेरिटमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत विविध पदांवर त्यांची नियुक्ती होते.

आयएएस

सर्वाधिक गुण असणाऱ्या उमेदवारांना आयएएस पदावर नियुक्त केलं जातं. जिथं शिकाऊ अर्थात Trainee IAS अधिकाऱ्याला 7 व्या वेतन आयोगानुसार प्रतिमहा 56100 रुपये इतकं मूळ वेतन लागू होतं.

मासिक वेतन

मूळ वेतनाव्यतिरिक्त अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये अनेक भत्ते जोडले जातात. ज्यामुळं पगाराचा आकडा प्रतिमहा 1 लाख रुपयांवर पोहोचतो आणि हुद्दयानुसार, श्रेणीनुसार पगारवाढ लागू होते.

सर्वोच्च पद

आयएएस अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी पदावर पोहोचताच प्रतिमहा वेतन 2,50,000 रुपयांवर पोहोचतं. हे आयएएस अधिकारी श्रेणीतील सर्वोच्च पद असतं.

VIEW ALL

Read Next Story