अंबानीच नव्हे, जगातील 'या' कुटुंबांनीही लग्नावर खर्च केली कोट्यवधींची रक्कम

केट मिडलटन आणि प्रिन्स विलियम

ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांच्या लग्नावर 33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.

विक्रम चटवाल आणि प्रिया सचदेव

विक्रम चटवाल आणि प्रिया सचदेव यांच्या लग्नात सुमारे 20 मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.

स्पेनच्या प्रिन्सचे लग्न

स्पेनचे प्रिन्स फिलिप आणि लेटिझिया ऑर्टिज रोक्सोलानी यांच्या लग्नासाठी अंदाजे 28-54 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आला होता.

राजीव रेड्डी आणि ब्राह्मणी जनार्दन रेड्डी

राजीव रेड्डी आणि ब्राह्मणी जनार्दन रेड्डी यांच्या लग्नाला 50 हजारांहून अधिक लोक आले होते. लग्नात एकूण 74 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.

मॅडेलीन ब्रॉकवे आणि जेकब लाग्रोन

मॅडेलीन ब्रॉकवे आणि जेकब लाग्रोन यांनी लग्नात 59 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे लग्न केले होते.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल

2018 मध्ये ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स हॅरीने मेगन मार्कलशी लग्न केले. त्यांच्या लग्नावर एकूण 63 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.

वनिशा मित्तल आणि अमित भाटिया

स्टील उत्पादन क्षेत्रातील मोठं नाव असणाऱ्या लक्ष्मी निवास मित्तल यांची एकुलती एक मुलगी वनिशा मित्तल हिच्या लग्नात सुमारे 65 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करण्यात आले होते.

VIEW ALL

Read Next Story