हिरे व्यापाऱ्याने 15 कोटींच्या

मालमत्तेवर सोडलं पाणी कारण की...

दिपेश शाह हे सुरतमधील सर्वात यशस्वी हिरे व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 15 कोटींहून अधिक आहे.

पाच वर्षांपूर्वी त्याचा 12 वर्षांचा मुलाने भौतिक सुखाचा त्याग करुन भिक्षुत्वाचे जीवन स्विकारले आहे. एवढंच नाही तर त्यांचा मुलीनेही जैन धर्माची दीक्षा घेतली आहे.

विशेष म्हणजे आज मुलांच्या याच मार्गाचा स्विकार करण्याचा निर्णय दिपेश शाह आणि त्यांची पत्नी पिका शाह यांनी घेतला आहे.

मोठ्या मेहनतीने उभारलेला व्यवसाय गुंडाळून व्यापारी आणि त्यांच्या पत्नीने संन्यासी जीनव जगण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली भौतिक संपत्ती आणि लक्झरी जीवनशैली सोडून या जोडप्याने इतर भिक्षूंच्या बरोबरीने मैल पायी चालत संयमाचं जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

भिक्षुपदाच्या तयारीसाठी दिनेश शहा यांनी आधीच 350 किमी चालले आहे तर पिकाने महिला भिक्षूंसोबत 500 किमीचं अंतर कापलंय.

VIEW ALL

Read Next Story