रेपो रेट स्थिर

भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतंच एमपीसी बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 16,2023

'या' 5 बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका!

RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवला असला तरी, देशातील अनेक बँकांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

कर्ज आणखी महागलं

ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी आणि कॅनरा बँकेसहित पाच मोठ्या बँकांनी एमसीएलआर वाढवत आपलं कर्ज महाग केलं आहे.

कॅनरा बँक

कॅनरा बँकेने एक महिन्याच्या कर्जावर MCLR 8.05 टक्के, तीन महिन्यांसाठी 8.15, सहा महिन्यांसाठी 8.50 आणि एक वर्षांसाठी 8.70 टक्के केला आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदानेही MCLR मध्ये 5 बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. ज्यामुळे एका वर्षात रेट वाढून 8 टक्के झाला आहे.

HDFC Bank

एचडीएफसी बँकेने काही ठराविक काळाच्या कर्जावर MCLR मध्ये 15 बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. नवे दर 7 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत.

ICICI Bank

ICICI बँकेने ऑगस्ट महिन्यात सर्व कालमर्यादेच्या कर्जावर MCLR मध्ये 5 बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे.

एक वर्षाच्या कर्जावर MCLR 8.40 टक्के

बदल केल्यानंतर ICICI बँकेत एक वर्षाच्या कर्जावर MCLR 8.40 टक्के, तीन महिन्यांवर 8.45 टक्के आणि सहा महिन्यांवर 8.8 टक्के वाढ झाली आहे.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाने ओव्हरनाइट MCLR 7.95 टक्के आणि एक वर्षांसाठी MCLR 8.70 टक्के केला आहे.

रेपो रेट 6.5 टक्क्यांवर

महत्त्वाचं म्हणजे, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. याच आधारे आरबीआय बँकाना कर्ज देत असतं.

VIEW ALL

Read Next Story