Boiled Chicken

तंदुरी, बटर चिकन नव्हे रोज खा Boiled Chicken; पाहा लाखामोलाचे फायदे

Jun 08,2023

प्रथिनांचा स्त्रोत

प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत म्हणून अनेकांचीच पसंती असणारं हे चिकन उकडून खाणं अर्थात चिकनच्या तेलकट पदार्थांपेक्षा Boiled Chicken खाण्याला प्राधान्य देणं कधीही फायद्याचं.

पोषक तत्वं

तुम्हीही चिकन खाऊन त्यातील पोषक तत्वं मिळवायचीयेत? तर कायमच ते उकडून खाण्याला प्राधान्य द्या.

Weight Loss

वजन कमी करण्यासाठी उकडलेलं चिकन खाणं अतिशय फायद्याचं. किंबहुना Weight Loss करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम अन्नपदार्थ ठरतो.

कॅलरींवरही नियंत्रण

तुम्ही जेव्हाही चिकन उकडता तेव्हा त्यातील स्निग्ध तत्वं नाहीशी होतात. असं चिकन खाल्ल्यानं शरीरातील कॅलरींवरही नियंत्रण राहतं.

विटामिन बी6

तुलनेनं चिकनचा रस्सा किंवा तळलेलं चिकन पचण्यास जड असतं. पण, उकडलेलं चिकन मात्र पोटालाही बादत नाही. यामध्ये विटामिन बी6 आणि विटामिन बी12 चं अधिक प्रमाण पाहायला मिळतं.

चयापचय प्रक्रिया

लोह, झिंक आणि क्षारांचा स्त्रोत असणारं उकडलेलं चिकन चयापचय प्रक्रिया सुरळीत करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतं.

मांसपेशींना ताकद मिळते

जाणून आश्चर्य वाटेल, पण चिकन उकडून खाल्ल्यास त्यामुळं मांसपेशींना ताकद मिळते आणि त्या अधिक बळकट होतात. हाडांच्या बळकटीसाठी चिकन कमालीची मदत करतं.

भूकेवर नियंत्रण

भूकेवर नियंत्रण ठेवणं, आरोग्यास पूरक वजन राखणं, शरीराला उर्जा देणं यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रथिनं उकडलेल्या चिकनमधून मिळतात. त्यामुळं इतर कोणत्याही पदार्थापेक्षा उकडलेलं चिकन, त्याचं सॅलड खाणं कधीदी उत्तम!

आहारतज्ज्ञांचा सल्ला

(वरील माहिली सामन्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, आहाराबाबतचे निर्णय घेण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story