IAS, IPSपेक्षा जास्त पगार देणाऱ्या 10 सरकारी नोकऱ्या

आयएएसना दरमहा 56 हजार 100 रुपये इतका पगार मिळतो. त्यानंतर साधारण 8 वर्षांमध्या हा पगार 1 लाख 31 हजार 249 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

आरबीआय बी ग्रेड अधिकाऱ्याला दरमहा बेसिक पगार 55 हजार 200 रुपये मिळतो. त्यामुळे संपूर्ण वेतनासह हा आकडा दरमहा 1 लाख 08 हजार 404 इतका जातो.

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात काम करणाऱ्यांना दरमहा 56 हजार 100 इतका पगार मिळतो. त्यांना विविध भत्तेदेखील दिले जातात.

इस्रो, डीआरडीओ शास्त्रज्ञ/इंजिनीअरला L-10 पे स्केलनुसार दरमहा 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 इतका पगार मिळतो.

भारतीय वन सेवेत अधिकाऱ्यांना सुरुवातीचा पगार 56 हजार 100, रु. पर्यंत असतो. तो वाढत जाऊन पुढे 2 लाख 25 हजारपर्यंत जातो.

SSC CGL नोकरी निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 1 लाख 51 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

सहाय्यक प्राध्यापकाला 57 हजार 700 रुपयांपासून पगार सुरु होतो. ते 1 लाख 82 हजार 400 रुपयांपर्यंत मिळतो.

PSUs वेतन संरचनेत इंजिनीअर्सना E2 ग्रेडनुसार पगार मिळतो. 50 हजार ते 1 लाख 60 हजार आणि इतर भत्ते असा पगार त्यांना दिला जातो.

सरकारी रुग्णालयातील ज्युनिअर रेसिडंट्सना मिळणारा सुरुवातीता पगार हा 52 हजार ते 53 हजारपर्यंत असतो.

भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच यूपीएससी परीक्षेतून आयएफएस अधिकारी,अवर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांना मिळणारा पगार लाखाच्या घरात असतो.

VIEW ALL

Read Next Story