Republic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो

Published by: Zee Team | Jan 26, 2024

26 जानेवारी 1950

15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झालेल्या भारतानं 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू केलं आणि त्या क्षणापासून भारत हा एक प्रजासत्ताक राष्ट्र ठरला.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

संचलन

1950 पासून देशात संविधान लागू झालं असलं तरीही, राजपथावर पहिल्यांदाच 1955 मध्ये संचलन पार पडलं.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

31 तोफांची सलामी

पहिल्या प्रजासत्ताक दिनं राजपथावर भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना 31 तोफांची सलामी देण्यात आली होती. त्यानंतर 1971 पासून 21 तोफांची सलामी देण्यास सुरुवात झाली.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

बिटिंग रिट्रीट

प्रजासत्ताक दिनाच्या बिटिंग रिट्रीटमध्ये 'Abide with Me,' सादर केलं जात होतं. पण, 2022 पासून त्याची जागा 'ए मेरे वतन के लोगों'नं घेतली.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

प्रमुख पाहुणे

देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे, म्हणून इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

पथसंचलनाचा वेग

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लष्कराच्या प्रदर्शनामध्ये पथसंचलनाचा वेग ताशी 5 किमी इतका होता.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

नागरिकांचा उत्साह

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आयोजित पथसंचलनासाठी नागरिकांचा उत्साहसुद्धा ओसंडून वाहत होता.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

VIEW ALL

Read Next Story