पगार किती मिळतो? नातेवाईकांच्या प्रश्नाला 'असं' द्या उत्तर

यूपीएससीची तयारी करुन घेणारे डॉ. दिव्यकिर्ति देशभरात प्रसिद्ध आहेत.

डॉ. दिव्यकिर्ति दृष्टी आयएएस कोचिंगचे संस्थापक आहेत.देशातील लाखो तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेतात.

देशभरात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ खूप पाहिले जातात.

अशाच एका व्हिडीओत त्यांनी पगार किती? असं विचारणाऱ्या नातेवाईकांना काय सांगायचं याचं उत्तर दिलंय.

तुमची सॅलरी ऐकून ते घाबरणार असतील तर आकडा सांगून टाका, असे दिव्यकिर्ति सांगतात.

तुम्हाला त्यांच्यावरील दबाव वाढवायचा असेल तर पगार थोडा वाढवून सांगा. कारण कोणी तुमचा पगार तपासायला येणार नाही.

तुमच्याशी तुलना करण्यासाठी त्यांना तुमच्या पगाराची माहिती हवी असते,असे ते सांगतात.

अशा व्यक्तींना थोडं दु:ख तर व्हायलाच हवं, त्यामुळे पगार तर वाढवूनच सांगायला हवा असे दिव्यकिर्ति सांगतात.

VIEW ALL

Read Next Story