आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात दातांची स्वच्छता करुन करतो.
दातांची स्वच्छता करण्यासाठी टुथब्रशचा वापर केला जातो.
पण एक टुथब्रश किती दिवस वापरायला हवा? तुम्हाला माहिती आहे का?
एक ब्रश 3 ते 4 महिने वापरायला हवे असे डेंटिस्ट म्हणतात.
ब्रशचा वापर केल्याने कॅविटी आणि हिरड्यांचे आजार दूर राहतात.
चांगल्या ओरल हेल्थसाठी ब्रश वेळोवेळी बदलत राहायला हवे असे हेल्थ एक्सपर्ट सांगतात.
त्यामुळे रोज दात घासताना टुथब्रशवर लक्ष द्या.
टुथब्रश जास्त घासलेला, कमजोर, वाकलेला दिसला तर तो लगेच बदला.
जुना टुथब्रश असेल तर दातांचे प्लाक आणि बॅक्टेरिया स्वच्छ होत नाहीत.
दातांची स्वच्छता ओरल हेल्थसाठी चांगली असते.