कापूर वापरुनही तुम्ही मच्छरांना पळवून लावू शकता. कापूर जाळल्यानंतर काही वेळ दरवाजा बंद ठेवा आणि नंतर धूर झाल्यानंतर तो उघडा. यामुळे बरेच मच्छर घराबाहेर जातील.
लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर हे लसणाचं पाणी घरात स्प्रे करा.
एका लिंबाचे 2 तुकडे करा आणि त्यामध्ये लवंग खोचा. (फोटोत दाखवल्याप्रमाणे) घरातील वेगवेगळ्या कोन्यांमध्ये हे ठेवा. यामुळे मच्छरांचा त्रास नक्कीच कमी होईल.
घरात मच्छर पळवून लावणारी काही छोटी झाडं कुंडीमध्ये लावली तरी त्याचा फायदा होतो. हा फार सोपा उपाय आहे.
घरातील स्टोअररुम, किचनमध्ये पाणी साचू देऊ नका. या पाण्यावरच मच्छरांची पैदास होते.
सूर्य मावळल्यानंतर दारं खिडक्या बंद कराव्यात. सामान्यपणे सायंकाळी मच्छर फार सक्रीय असतात. खिडक्यांना मॉस्किटो नेट लावून घ्यावी.
मात्र मच्छरांच्या त्रासावर जालीम उपाय म्हणून घरातीलच काही गोष्टींचा स्मार्टपणे वापर करता येईल.
आपल्यापैकी अनेकांच्या घरात मच्छरांमुळे होणारा त्रास हा मोठा प्रश्न असतो. खास करुन सायंकाळी घरात प्रवेश करणारे मच्छर रात्रभर त्रास देतात.