रात्री दुचाकीवरुन जात असताना कुत्रे पाठलाग करतात आणि जोरजोरात भुंकतात अशावेळी काही लोक घाबरुन बाईकचा स्पीड वाढवतात आणि मग अपघात होतो.
रात्री कुत्र्यांच्या जवळून बाईक नेल्यानंतर ते जोरजोरात भुंकायला सुरुवात करतात. कधी कधी पाठलागही करतात.
दुचाकीवरुन जात असताना कुत्रे पाठलाग करत पायाला चावल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशावेळी काय करावे, असा प्रश्न तुम्हाला पडतो.
कधी तुमच्यासमोर असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा काय कराल? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगतो.
रात्रीच्या अंधारात वाहनं पाहून कुत्रे का भुंकतात हे आधी जाणून घेऊया. एखादे वाहन जलद गतीने त्यांच्याजवळ येताना पाहताच ते सावध होतात आणि भुंकायला सुरु करतात.
तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही वेगाने बाइक चालवता तेव्हाच कुत्रे तुमच्यावर भुंकतात कारण त्यांना धावणारी वस्तू पकडायची असते.
त्यामुळं तुम्ही एक मानसशास्त्रीय (सायकोलॉजिकल) युक्ती वापरुन पाहा.
तुम्हाला वाटेत कुत्रा दिसला तर तुमच्या बाईकचा वेग कमी करा आणि हळूहळू तिथून निघून जा
बाइकचा स्पीड कमी करुनही कुत्रा परत फिरत नसेल तर बाइक थांबवा मग कुत्रा देखील थांबेल व निघून जाईल
एक लक्षात घ्या की, कुत्रा मागे लागल्यावर कधीही पॅनिक होऊन गाडी चालवू नका त्यामुळं अपघात होऊ शकतो तसेच अधिक त्वेषाने कुत्रे मागे लागतील