भारतात समोसा आणि बटाटावडा हा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय पदार्थ आहे. भूक लागली किंवा पटकन काही खायचं असेल तर सर्वात पहिला आठवतो तो समोसा.
शहरातील ठेले, स्वीटमार्ट, चहाच्या टपरी आणि हॉटेलमध्ये समोसा हमखास मिळतो. पण तुम्हाला माहित आहे का समोसा हा पदार्थ मुळचा भारतीय नाही.
समोसाचा इतिहास फार जुना आहे. याच पहिला संदर्भ हा 10 व्या शतकात मध्य आशियातील इराणी इतिहासकाराच्या ग्रंथात मिळतो.
समोसाचे मूळ नाव संबुश्क असं आहे. त्या काळातील व्यापारी प्रवासात खाण्यासाठी समोसाचा वापर करत असल्याचं सांगितलं जातं
ऐन इ अकबरी या ग्रंथात समोस्याचा उल्लेख सानबुसा असा आहे.
भारतात येता येता याचं नाव समोसा पडलं,परदेशी लोकांसह समोसा भारतात पोहोचला
भारतात येता येता समोशांच्या आकारात आणि चवीमध्येही अनेक बदल झालेले पाहिला मिळतात.
समोसा म्हटलं की बटाट्याची भाजी घातलेला आणि त्रिकोणी आकाराचा तळलेला पदार्थ असंच चित्र डोळ्यापुढे येतं
पण भारतात किमान 15 ते 20 प्रकारे समोसा बनवला जातो. गुजरातमध्ये बिन्स आणि मटार यांने समोसा बनवला जातो
हैदराबादमध्ये लुखमी या नावाने समोसा प्रसिद्ध आहे. यात बटाटा भाजी न वापरता खिमा वापरला जातो