Indian History : इटॅलिअन प्रवासी मार्को पोलो यांनी 800 वर्षांपूर्वीं भारत कसा होता, याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्यांनी, 'गरुडांपासून होणारी हिऱ्यांची शेती' आणि 'मंत्रांनी शोधले जाणारे मोती' यांसारख्या गोष्टी लिहिल्या आहेत.
चीनचे राजा कुबलई खान यांनी पोलो, सुमत्रा आणि बर्मा यांना माहिती गोळा करण्यासाठी भारतात पाठवलं होतं. मार्को लिहितात, भारताबद्दल लिहिण्यासाठी एवढं काही आहे की लिहायला आणखी काही उरणारच नाही.
मार्को भारताच्या अंदमान निकोबार बेटांच्या समुहाबद्दल लिहितात, इथले लोक पानांचे कपडे घालतात. इथे कोणी राजाच नसतो. ते पुढे लिहितात की कोरोमंडल किनारा भारताच्या दक्षिणी-पूर्व क्षेत्रात स्थित आहे. इथले लोक किनाऱ्याशोजारी आरडाओरडा करुन मासे दूर पळवतात.
मासे दूर जाताच माच्छिमार पाण्यात उतरुन मोती शोधुन आणतात. हे मोती भारतातून दुसऱ्या देशांमध्ये विकले जातात आणि त्यातून येणाऱ्या फायद्याचा 20 टक्के भाग इथे राहणाऱ्या लोकांच्या समुहाला दिले जातो, असं वर्णन त्यांनी केलं आहे.
मार्को भारतात तमिळनाडुच्या दौऱ्यावर असताना, राजाचं ऐश्वर्य पाहून आश्चर्यचकित झाले होते. आपल्या प्रवासवर्णनात ते लिहितात, भारतातील राजे इतके दागिने घालतात की राज्याची संपूर्ण संपत्ती त्यांनी अलंकारांवरच उधळली असावी.
मार्कोंच्या मते दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात हीऱ्यांचा व्यापार चालू होता. तमिळनाडुत एक नियम आसाही होता की जर, एखाद्या व्यक्तिने वेळेत घेतलेल्या कर्जाची परतफेड नाही केली तर त्या व्यक्तिला कर्जदारांच्या घोळक्यात बंदिस्त केले जात. जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही.
घोळक्याच्या बाहेर असलेले लोक स्वतंत्र होते. ते आत असलेल्या व्यक्तिबरोबर हवी तशी वर्तवणूक करु शकत होते.