भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली.

May 28,2024


भारतात जवळपास 17 शहरात मेट्रो धावते. देशभरात 902 किलोमीटर इतकं मेट्रोचं जाळं आहे.


देशात मेट्रोचा सर्वात मोठा मार्ग दिल्लीत आहे. दिल्लीत 2002 पासून मेट्रो सुरु झाली आणि आज मेट्रोचा मार्ग जवळपास 393 किमी इतका आहे.


मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे असून आणखी 50 किमीचा मार्ग खुला करण्यात येणार आहे. याशिवाय पुणे आणि नागपूरमध्येही मेट्रो धावते


साधारण सर्वच शहरात पहिली मेट्रो सकाळी 5.30 वाजता धावते. तर शेवटच्या मेट्रोची वेळ रात्री 12 वाजता असते.


देशातील अनेक प्रमुख शहरात लोकांची रात्रीही रहदारी असते. मग मेट्रो सेवा रात्री का सुरु नसते असा अनेकांना प्रश्न पडतो.


संपूर्ण दिवसभर मेट्रोची सेवा सुरु असते. त्यामुळे रात्री मेट्रो आणि मेट्रोच्या ट्रॅकची तपासणी आणि दुरुस्ती केली जाते. यामुळे रात्री मेट्रो चालवली जात नाही.

VIEW ALL

Read Next Story