रेल्वे रुळांच्या आजुबाजूला खडी का टाकलेली असते? जाणून घ्या
Railway Facts : रेल्वेनं प्रवास करत असताना किंवा नुसतंच फलाटावर उभं राहिलं असता अनेकदा लक्ष जातं ते म्हणजे रेल्वे रुळांवर. धावत्या रेल्वेगाडीतून पाहिल्यास जणू रुळ आपल्यासोबतच प्रवास करत आहेत असंही वाटतं.
अशा या रेल्वे रुळांकडे पाहिल्यानंतर समोर येणारी आणखी एक बाब म्हणजे त्या रुळाच्या लोखंडी पट्ट्यांच्या आजुबाजूला टाकलेली खडी. ही खडी, बारीक दगड तिथं नेमके का असतात तुम्हाला ठाऊक आहे?
रेल्वे रुळांवर खडी टाकलं जाण्याचं एक कारण म्हणजे, यामुळं रुळ आणखी भक्कम होतात. काँक्रीटच्या स्लीपरवर रेल्वे रुळ बसवलेले असतात. त्यांच्या मध्ये ही खडी असते.
रुळ आणि स्लीपरच्या दरम्यान पोकळी असल्यास खाली असणारे स्लीपर सरकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं हे लहानलहान दगड तिथं असणं अतीव महत्त्वाचं.
रेल्वे जेव्हा अतीप्रचंड वेगानं रुळांवरून जाते तेव्हा रुळांमध्ये बरीच कंपनं जाणवतात. ही खडी ती कंपनं कमी करण्याचं काम करतात, ज्यामुळं त्यांना 'ट्रॅक बॅलस्ट' असंही म्हणतात.
रेल्वे रुळांवर विविध आकारांचे खडक टाकण्यामागचं कारण म्हणजे, त्यांचा आकार वेगळा असल्यामुळं ते एकमेकांना घट्ट धरून राहतात. एकाच आकाराचे दगड टाकल्यास त्यांच्यामध्ये घर्षण होण्याची शक्यता जास्त असते.
थोडक्यात रेल्वे रुळांच्या आजुबाजूला असणारी ही खडीसुद्धा तितकीच महत्त्वाची असल्या कारणानं रुळांच्या बाजूला गवत नव्हे, खडी पसरवली जाते.