भारतीय शेअर मार्केटचा जगभरात डंका! केला 'हा' नवा जागतिक विक्रम

Swapnil Ghangale
Jan 23,2024

नुकताच नवा विक्रम

भारतीय शेअर बाजाराची दमदार घौडदौड सुरु आहे. भारतीय शेअर बाजाराने नुकताच नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

एकूण मार्केट कॅप किती?

मार्केटमधील लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केट कॅप आता 4.33 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे.

चौथा सर्वात मौल्यवान शेअर बाजार

कंपन्यांचे मूल्य पाहात आता भारतीय शेअर बाजार हा जगातील चौथा सर्वात मौल्यवान शेअर बाजार झाला आहे.

हाँगकाँगला टाकलं मागे

भारतीय शेअर बाजाराने मूल्याचा विचार केल्यास हाँगकाँगच्या शेअर मार्केटला मागे टाकलं आहे.

भारत आणि हाँगकाँगची तुलना

भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांची मार्केट कॅप 4.33 ट्रिलियन डॉलर असून हाँगकाँगच्या शेअर बाजाराची मार्केट कॅप 4.29 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.

भारतीय शेअर बाजार सकारात्मक

हाँगकाँगमधील हँगसेंग शेअर मार्केटने सलग 4 वर्षांपासून नकारात्मक परतावा दिला आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजार सलग 8 व्या वर्षी सकारात्मक परतावा देतोय.

सातत्याने घसरण

हाँगकाँग शेअर मार्केट 2021 मध्ये 6 ट्रिलियन डॉलरच्या उच्चांकावरुन खाली सरकत आहे. भारतीय शेअर बाजाराची मार्केट कॅप याच कालावधीत 3.5 ट्रिलियनपासून वाढली आहे.

केवळ 3 देश भारताच्या पुढे

आता केवळ अमेरिका, चीन आणि जपानी शेअर बाजार भारतीय शेअर बाजारापेक्षा पुढे आहे.

जापानी शेअर बाजाराचे मूल्य किती?

तिसऱ्या क्रमांकावर जापानी शेअर बाजार असून त्याचं मूल्य 6.36 ट्रिलियन डॉलर इतकं आहे.

चिनी शेअर बाजाराचे मूल्य किती?

दुसऱ्या क्रमांकावरील चिनी शेअर बाजाराचे मूल्य 8.8 ट्रिलियन डॉलर इतकं आहे.

अमेरिकी शेअर बाजाराचं मूल्य किती?

पहिल्या क्रमांकावरील अमेरिकी शेअर बाजाराचे मूल्य 50.86 ट्रिलियन डॉलर इतकं आहे.

VIEW ALL

Read Next Story