काश्मीर, हिमाचलवर बर्फाची चादर; Photos पाहून तुम्हीही म्हणाल, 'हा स्वर्गच...'!
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरात बुधवारी रात्री बर्फवृष्टी झाली आणि या मोसमातील पहिल्याच बर्फवृष्टीने पर्यटक सुखावले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी झाली असून, गुलमर्गमध्ये पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद लुटला.
जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडाच्या मैदानी परिसरात बुधवारी मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. यावेळी घरं, रस्ते, झाडं सगळीकडे बर्फच बर्फ पाहायला मिळाला.
जम्मू-काश्मीरच्या डोडा परिसरातही जोरदार बर्फवृष्टी झाली. ज्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचं काम सुरू झालं.
तिथे उत्तराखंडच्या उत्तरकाशी, चमोलीत बर्फवृष्टी झाली. ज्यामुळं बद्रीनाथ धाम परिसरासह गंगोत्री धाम मंदिरही बर्फाच्या चादरीखाली गेलं.
हिमाचलच्या शिमला, मनालीसह कुल्लू परिसरातही बर्फवृष्टी झाली आणि हायवेवरील वाहतुकीला फटका बसला.
शिमल्यातल्या डोंगरदऱ्यांमध्येही बर्फाची चादर पाहायला मिळाली. तर, जोरदार बर्फवृष्टीमुळे अटल बोगद्यात 400 पर्यटक अडकले. स्थानिक पोलिसांकडून पर्यटकांची सुटका करण्यात आली.