'या' क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढणार; 2023 ते 2027 पर्यंत कोणाची चांदी?
भविष्यात नेमकी कोणत्या क्षेत्रात नोकीच्या संधी वाढणार असा प्रश्न तुम्हालाही पडल असेल, तर त्याचं उत्तर आहे AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स. AI ची सातत्यानं होणारी प्रगती पाहता या क्षेत्रात करिअर करणं ही एक योग्य निवड ठरणार आहे.
ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2024 मध्ये झालेल्या चर्चेनुसार 2024 ते 2027 या चार वर्षांच्या काळात एआय आणि मशीन लर्निंग तज्ज्ञ या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी वाढणार आहेत.
एआयमागोमाग ज्या क्षेत्रात सर्वाधिक नोकरी उपलब्ध होणार आहे ते आहे, शाश्वकत विकासतज्ज्ञ आणि बिझनेस इंटेलिजेन्स.
इन्फर्मेशन सिक्युरिटी, फिनटेक इंजिनिअर्स आणि डेटा अॅनालिस्ट क्षेत्रातही कमालीच्या नोकरीच्या संधी पाहायला मिळतील.
रोबोटीक इंजिनिअरिंग आणि शेती उपकरण तज्ज्ञ या अनपेक्षित क्षेत्रांचीही येत्या काळात भरभराट होणार आहे.
सध्या सर्वाधिक नोकऱ्या असणाऱ्या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण, मेकॅनिक्स, मशिनरी रिपेअरिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, प्राध्यापक, इलेक्ट्रोटेक्नोलॉजी इंजिनिअर्सचा समावेश आहे.