Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराचं खरं वय ऐकून व्हाल हैराण
मंदिराची एकंदर रचना आणि सुस्थितीत असणारी संपूर्ण वास्तू पाहता हे मंदिर नेमकं किती जुनं आहे याचा अंदाज अनेकांनीच लावण्याचा प्रयत्न केला. अगदी पुराणांमध्येही डोकावणं झालं.
पौराणिक कथांचा आधार घ्यायचा झाल्यास महाभारतातील युद्धानंतर पांडव शंकराच्या शोधात या भागात आले होते. असंही म्हटलं जातं की देवादिदेव महादेवानं इथं वास्तव्य केल्यामुळं या ठिकाणाला गुप्तकाशीही म्हणतात.
असं म्हटलं जातं की पांडव भेटीसाठी आलेले असताना शंकरानं नंदीचंच रुप घेतलं आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला. पण, पाच पांडवांमधील एकानं म्हणजेच भीमानं त्या नंदीला हेरलं.
भीमाची नजर पडताच नंदी धरणीमध्ये लुप्त झाला आणि पाठीवरील भाग तिथंच राहिला. ज्यानंतर पांडवांनी त्या पाठीच्या भागाभोवतीच मंदिर बांधलं जे केदारनाथ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
काही वैज्ञानिकांच्या मते 400 वर्षे बर्फाखाली गाडलेलं असूनही या मंदिराचं नुकसान झालं नाही. असं म्हणतात की, 13ते 17 व्या शतकामध्ये इथं एक लहानसं हिमयुग आलं होतं. ज्यामध्ये मंदिराचं नुकसान झालं नाही.
वैज्ञानिकांच्या मते 13 ते 17 व्या शतकामध्ये आलेल्या हिमयुगामध्ये हिमालयाचा बहुतांश भाग बर्फाखाली गेला होता. परिणामी केदारनाथ मंदिराच्या भींतींवर आजही त्या काळच्या काही खुणा दिसतात.
बर्फ वितळ्यानंतर मंदिराच्या भिंतीवर तसेच इतर भागांवर काही कायमच्या खाणाखूणा राहिल्या. आज हा बर्फ वितळून शेकडो वर्ष उलटल्यानंतरही हे मंदिर बर्फाच्छादित होतं याचे पुरावे मंदिराच्या आतील बाजूस असलेल्या भिंतींवर आणि जमीनीवर पाहायला मिळतात.
काहींच्या मते विक्रम संवत् 1076 पासून 1099 पर्यंत मालवाचे राजा भोज यांनी हे मंदिर उभारल्याचंही म्हटलं जातं. काहींच्या मते आपण आजच्या घडीला जे मंदिर पाहतो ते आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी उभारलं होतं.
इसवीसनपूर्व 788–820 दरम्यानच्या काळात शंकराचार्यांच्या जीवनकाळाकडे लक्ष वेधलं जातं. ज्यामुळं या मंदिराच्या रचनेमध्ये त्यांच्या योगदानाचेच संदर्भ सध्या सांगितले जातात. तेव्हा आता तुम्हाला नेमका अंदाज आलाच असेल, की केदारनाथ मंदिर नेमकं किती जुनं आहे.....