पवित्र आणि धार्मिक महत्त्व

भारतात गंगा नदीला प्राचीन काळापासून विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानलं जातं.

भारतीयांची जीवनदायिनी

गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत आणि बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे

5 राज्यातून वाहते गंगा

गंगा नदी भारतातील 5 राज्यांमधून वाहते. गंगा नदीचा प्रवाह सुमारे 2525 किमी इतक आहे.

गंगा नदीचा उगम

गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा

उत्तराखंडमध्ये उगम

भारतात गंगा नदीचा उगम उत्तराखंडमधून होतो, उत्तराखंडमध्ये गंगा नदीची लांबी 320 किमी आहे.

उत्तरप्रदेशातूनही वाहते गंगा

उत्तराखंडातून गंगा नदी उत्तर प्रदेशात येते. उत्तर प्रदेशात गंगा नदीची लांबी सुमारे 1,140 किमी आहे

उत्तप्रदेशमधून बिहारमध्ये

उत्तर प्रदेशानंतर गंगा नदी बिहारमध्ये येते. बिहारमध्ये गंगा नदी सुमारे 445 किमी वाहते

झारखंडमध्येही गंगेचा प्रवाह

बिहारनंतर, गंगा नदी झारखंडमध्ये वाहते, बिहारच्या शेजारील राज्य, झारखंडमध्ये गंगा नदी सुमारे 40 किमी वाहते.

पश्चिम बंगालमध्ये प्रवेश

झारखंडनंतर पश्चिम बंगालमध्ये गंगा नदी 520 किमी वाहते. पश्चिम बंगालनंतर गंगा नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते

गंगेच्या किनारी ऐतिहासिक नगरं

भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटणा, प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक आणि आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.

VIEW ALL

Read Next Story