चीनचं राहुद्या...

चीनचं राहुद्या... भारतातील राज्यच एकमेकांवर करतायत अतिक्रमण; तब्बल 14 किमी भूखंडावर ताबा

भूखंडाचा ताबा

मुळच्या हिमाचल प्रदेशातील असणाऱ्या सरचू प्रांतामध्ये लेह लडाखकडून जवळपास 14 किमी अंतरापर्यंतच्या भूखंडाचा ताबा घेण्यात आला आहे.

लडाखचं अतिक्रमण

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माहितीनुसार लाहौल स्पितीच्या सरचू येथील छरब नाला भागात लेह लडाखकडून पिलर उभे करण्यात आले आहेत.

सहकार्याचा अभाव

या वादामध्ये हिमाचल प्रदेश सरकारकडून पूर्ण सहकार्य केलं जात नसल्याची प्रतिक्रिया या लोकप्रतिनिधींनी दिली. किंबहुना काही दिवसांपूर्वी इथं सर्वे जनरल ऑफ इंडियाच्या एका दलानं भेटही दिली होती.

अधिकाऱ्यांची भूमिका

हिमाचलमधील अधिकाऱ्यांची मौन भूमिका सध्या यावर तोडगा काढण्यास अडचणी निर्माण करत असल्याचा सूर स्थानिकांनी आळवला आहे.

वाद सरचूचा

मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी आदेश देऊनही सरचूमध्ये आतापर्यंत पोलीस चौकी उभी करण्यात आलेली नाही.

तोडगा निघणार कसा?

दरम्यान आता पुन्हा एकदा सर्वे जनरल ऑफ इंडियाचं पथक भेट देणार असून, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून हा वाद निकाली काढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story