महिन्याला 5 हजार गुंतवा आणि मिळवा 2.75 कोटी; जाणून घ्या कसं

स्मार्टपणे गुंतवणूक केली तर खरोखरच 5 हजारांच्या गुंतवणुकीतून कोट्यधीश होणं शक्य आहे. कसं ते पाहूयात..

पारंपारिक गुंतवणुकीबरोबरच वेगवेगळे पर्याय

गुंतवणूक आणि बचतीसंदर्भात लोकांच्या दृष्टीकोनामध्ये मोठा बदल झाला आहे. आता लोक चांगला परतावा मिळावा म्हणून पारंपारिक गुंतवणुकीबरोबरच वेगवेगळे पर्यायही निवडतात.

म्यूचुअल फंडामध्ये गुंतवणूक

म्यूचुअल फंडामध्ये गुंतवणूक करणं हा गुंतवणुकीचा एक स्मार्ट प्रकार मानला जातो. हल्ली अनेकजण म्यूचुअल फंडामध्ये गुंतवणूक करतात.

नफा बाजारातील घडामोडींवर अवलंबून

म्यूचुअल फंडातील गुंतवणुकीमधून मिळणारा परतावा हा बँकेतील गुंतवणुकीपेक्षा अधिक असतो. मात्र यामधील नफा हा बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतो.

भविष्यासाठी चांगला निधी जमवता येईल?

म्यूचुअल फंडामध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळतो असं अनेकजण म्हणतात. पण खरोखर म्यूचुअल फंडाच्या माध्यमातून भविष्यासाठी चांगला निधी जमा करता येऊ शकतो का?

योग्य नियोजन आवश्यक

या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. पण म्यूचुअल फंडामधून भविष्यासाठी समाधानकारक निधी गोळा करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे.

बोलकी आकडेवारी

दिर्घकालीन इक्विटी मार्केट आणि म्यूचुअल फंडामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरु शकतं. हे आम्ही नाही आकडेवारी सांगतेय.

2.75 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा

तुम्ही महिन्याला 5 हजार रुपयांची दिर्घकालीन बचत करुन म्यूचुअल फंडामध्ये गुंतवली तर तुम्हाला त्यामधून 2.75 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.

14 टक्क्यांनी परतावा मिळाला तर...

'द असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडिया' या वेबसाईटवरील आसआयपी कॅलक्युलेटरनुसार एसआयपीमध्ये दर महिन्याला 5 हजार गुंतवल्यास वर्षाला 14 टक्क्यांच्या हिशोबाने 30 वर्षांमध्ये 2.50 कोटी रुपये रिर्टन मिळतील.

पूर्ण परतावा पद्धतीची आकडेवारी

या कालावधीमध्ये एकूण 18 लाख रुपये जमा होतील. मात्र हे समिकरण पूर्ण परतावा पद्धतीचं आहे.

माहिती सामान्य आकडेवारीवर आधारित

Disclaimer: ही माहिती सर्वसाधारण आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.

VIEW ALL

Read Next Story