त्यांच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहताना सगळ्या चिंता आणि भीती कुठच्या कुठे दूर पळाल्याचीच अनुभूती होत आहे.
वाल्मिकी रामायण, रामचरितमानस या आणि अशा अनेक ग्रखांचा आधार घेत त्यामध्ये दिलेल्या वर्णनांच्या आधारे AI तंत्रज्ञानाचा वापर करत प्रभू रामाचं हे रुप साकारण्यात आलं आहे.
शांत आणि निरपेक्ष नजर, बोलका चेहरा हे असं रुप न्याहाळतच रहावं असं वाटत आहे.
रुपेरी पडदा म्हणू नका किंवा छोटा पडदा, श्री राम वेगवेगळ्या रुपात आपल्या भेटीला आले. पण, तारुण्यावस्थेत ते नेमके कसे दिसत असावेत याचं चित्र मात्र या फोटोंमुळं समोर आलं आहे.
रामभक्तांसाठी तर, हे फोटो म्हणजे परवणीच ठरत आहे. दशरथपुत्र श्रीराम यांचा जीवनप्रवास आजवर अनेक पुराणकथांमधून उलगडला.
प्रभू श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, प्रभू श्रीराम म्हणजे विजय, प्रभू श्रीराम म्हणजे सर्वस्व.... हे सारंकाही AI जनरेटेड फोटो पाहताना लक्षात येत आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी असे दिसायचे प्रभू श्री राम; संपूर्ण रुप पाहून भान हरपेल