लसूण चटणी ताटात असली की जेवणाची लज्जत आणखी वाढते. याची रेसिपी अगदी सोपी आहे.

Aug 14,2023


लसणाच्या पाकळ्या, सुखं खोबरं, लाल मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडसं तेल फक्त इतक्या साहित्यात लसूण चटणी बनवता येते.


थोड्याशा तेलात सुखं खोबरं, लाल मिरची हलक्या अचेवर भाजून घ्यावे. लसणाला देखील थोडीशी वाफ द्यावी.


भाजलेलं सुखं खोबरं, लाल मिरची एकत्र करुन त्यात चवीनुसार मीठ घालावे.


एकत्र केलेलं मिश्रण खलबत्त्यात कुटावे किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.


लसूण चटणी जास्त दिवस टिकावी यासाठी त्यात दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकावा.


लसूण चटणी हवा बंद डब्यात व्यवस्थित पॅक करुन ठेवावी. यामुळे चटणीची चव बराच काळ जशीच्या तशी राहते.


लसूणमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. लसणाचे सेवन केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. अनेक रोग होण्याचा धोका टळतो.

VIEW ALL

Read Next Story