ढोकळा खाताना कोरडा लागतो; ही पद्धत वापरुन बनवा जाळीदार खमण

रविवारची सुट्टी असली की नाश्त्यामध्ये निरनिराळे पदार्थ केले जातात. त्यातीलच ढोकळा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.

ढोकळा ही गुजराती पदार्थ असला तरी महाराष्ट्रातही मोठ्या आवडीने खाल्ला जातो. पण कधी ढोकळा नीट फुलत नाही त्यामुळं सो सॉफ्ट होत नाही, अशावेळी काय करावे. त्यासाठी वापरा या टिप्स

साहित्य

१ कप बेसन, ४ टीस्पून साखर, हिरवी मिरची, १ टीस्पून आलं, १/2 कप दही, १/२ टीस्पून हिंग, १ टीस्पून राई, ६-७ पाने कडीपत्ता, नमक स्वादानुसार, १/२ टीस्पून फ्रुट सॉल्ट किंवा ईनो, ६ टेबलस्पून तेल, पाणी आवश्यकतेनुसार

कृती

सगळ्यात पहिले एका भांड्यात बेसन घ्या. त्यात हिरवी मिरची, दही, साखर, ४ टेबलस्पून तेल, मीठ आणि अर्धा कप पाणी टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या. लक्षात ठेवा की या मिश्रणात गुठळ्या राहता कामा नये.

आता या मिश्रणात फ्रुट सॉल्ट, एक मोठा चमचा इनो टाकून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करुन घ्या. तुमच्या ढोकळ्याचे बॅटर तयार झाले.

ढोकळा बनवताना एका भांड्याला तेल लावून घ्या आणि त्यात हे पीठ घाल. भांडं 2 ते 3 वेळा हळूवार वर खाली हलवून घ्या. जेणेकरुन गुठण्या राहणार नाहीत.

20 मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवून घ्या. छान वाफ आली की ढोकळ्याचे भांडे बाहेर काढून काप पाडून घ्या. त्यानंतर राई, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. तयार आहे गरमागरम ढोकळा

VIEW ALL

Read Next Story