ज्योतिष शास्त्रानुसार पुरुष-महिलांच्या अंगावर असलेल्या तिळाचे वेगवेगळे अर्थ निघतात.
महिलांच्या शरीराच्या कोणत्या भागावर असलेला तीळ शुभ मानला जातो, हे जाणून घेऊया.
महिलेच्या माथ्यावर मधोमध असलेला तीळ प्रतिनिधीत्व करण्याचे प्रतिक आहे. उजवीकडचा तीळ प्रसिद्धी, यशाचे प्रतिक आहे.
भुवयांच्यावर असलेला तीळ महिलांसाठी शुभ मानला जातो. या महिला बुद्धिमान असतात.
ओठांवर तीळ असलेल्या महिला खूप आकर्षक आणि मेहनती असतात.
खांद्यावर तीळ असलेल्या महिलेकडे नेतृत्व करण्याची क्षमता असते.
गालावर तीळ असलेल्या महिला मनाने स्वच्छ असतात. त्यांना पैशांची कधी कमी भासत नाही.
मानेवत तीळ असलेली महिला खूपच धैर्यवान मानली जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही)