पावसाळ्यात ऑफिसला जाताना 7 गोष्टींची काळजी घ्या आणि निश्चिंत व्हा

पावसाळ्यामध्ये ऑफिसला जाताना 7 महत्त्वाच्या गोष्टींची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय उपयोग होतो पाहूयात...

Swapnil Ghangale
Jul 27,2023

छत्री, रोनकोट तर आपण घेतोच पण...

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ऑफिसला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. छत्री आणि रेनकोटसारख्या गोष्टी आपल्या लक्षात असतात पण इतरही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अगदी प्रवासापासून ते ऑफिसमध्ये गेल्यानंतरही काही अडचण येऊ नये म्हणून अगदी सोप्या गोष्टी तुम्हाला फॉलो करता येतील. या 7 गोष्टी कोणत्या पाहूयात...

शूज

अनेक कार्यालयांमध्ये ड्रॉवर दिलेले असतात. अशात ऑफिसला जाताना पावसाची सॅन्डल किंवा चप्पल वापरा, एक पेअर शूज आणि सॉक्स ऑफिसमध्ये ठेवा. अन्यथा कॉर्पोरेट ऑफिसला गेल्यावर शूज ड्राय झाले तरी सॉक्स दिवसभर ओले राहतील.

शर्ट

आपल्या बॅगेत एक एक्सट्रा शर्ट किंवा टी शर्ट किंवा कुर्ता आवश्य ठेवा. 

फूड

बॅगेत खाण्यासाठी बिस्किट, वेफर्स, चॉकलेट किंवा स्नॅक्स आणि पाणी नेहमीच ठेवा. वाहतूक कोंडी झाली किंवा कुठे अडकलात तर उपाशी राहावे लागू नये.

फोन पाऊच

अगदी कुठल्याही फोन शॉपमध्ये ३० ते ४० रुपयांत मिळून जाईल. बॅकपॅक वॉटर प्रूफ असल्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात तसे होत नाही.

फोन चार्जिंग

घरातून निघण्यापूर्वी किंवा ऑफिसमधून निघण्यापूर्वी तुमचा फोन चार्ज आवश्य करून घ्या. पॉवर बँकही ठेवता येईल. लोकल किंवा ट्रॅफिक जाम झाल्याच्या परिस्थितीत फोन बंद होऊ नये. 

हॅन्ड टॉवल

बॅगेत फूड आणि पॉवर बँकसोबत छोट्या आकाराच हॅन्ड टॉवलही ठेवा. पावसामधून भिजून गेल्यानंतर डोकं, हातपाय पुसण्यासाठी हा हॅन्ड टॉवेल वापरता येईल.

वर्क फ्रॉम होम

ऑफिसपासून घर फार दूर असेल आणि ऑनलाइन सुद्धा काम शक्य असेल तर आपल्या मॅनेजरशी चर्चा करा. अधिक पाऊस असेल तर वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या.

VIEW ALL

Read Next Story