भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मात्र, अंबानी यांचा जन्म भारतात झालेला नाही.
मुकेश अंबानी हे रिलायन्स कंपनीचे मालक आहेत. जगभरात अंबानी यांच्या 500 पेक्षा जास्त कंपन्या आहेत.
मुकेश अंबानी हे धीरुभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांचे सर्वात मोठे सुपूत्र आहेत.
मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला.
मुकेश अंबानी यांचा जन्म यमनच्या एडन येथे झाला. आई वडील धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी ब्रिटिश क्राउन कॉलनीमध्ये राहत होते.
मुकेश अंबानी यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतूनच पूर्ण झालं. अंबानी यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या संपत्तीमुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्याचं राहणं-खाणं आणि महागड्या कपड्यांवरून नेहमीच चर्चा होत असते.