म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे फंड मॅनेजरद्वारे मॅनेज केले जातात.
इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड याचे 2 मुख्य प्रकार आहेत.
शेअर बाजारात ही गुंतवणूक केली जाते. ज्यात बाजाराच्या चढ उताराचा धोकाही असतो.
क्वालिटी फंडची किंमत कमी असेल तेव्हा तुम्ही त्यात गुंतवणूक करुन चांगली कमाई करु शकता.
यासाठी तुम्हाला 72 ता नियम माहिती असायला हवा.
72 ला रिटर्नच्या टक्केवारीने भागल्यास पैसे किती वर्षात दुप्पट होणार हे कळते.
जितका चांगला सीएजीआर तितक्या लवकर पैसे दुप्पट होण्याचे चान्स असतात.
72 ला व्याजदराने भागा. यानंतर गुंतवणुक दुप्पट व्हायला किती वर्षे लागतील हे समजेल.
दुप्पट पैसे कधी होतील हे माहिती करुन घ्यायचे असेल तर 72 ला एकूण गुंतवणूक वर्षांनी भागून रिटर्न दर जाणून घ्या.
समजा एका वर्षात 12 टक्के इतका रिटर्न मिळतोय तर 72 भागिले 12 केल्यास 6 वर्षात पैसे दुप्पट होतील, हे कळेल.