शौचालये साफ करणे हे आपल्याकडे कमीपणाचे मानले जाते. पण 690000 कोटींच्या व्यवसायाचा मालक आजही स्वत:चे शौचालय स्वत: स्वच्छ करणे पसंत करतो.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी स्वतःचे शौचालय स्वच्छ करण्याचे उघडपणे मान्य करुन प्रस्थापित नियमांना हादरा दिलाय.
78 वर्षीय अब्जाधीश नारायण मुर्ती व्यवसायात प्रत्येकाशी आदराने वागण्याच्या महत्त्वावर जोर देतात.
मी माझ्या मुलांना हळूवारपणे आणि प्रेमाने समजावून सांगेन की इतर लोकांचा आदर करण्याचे ह सर्वोत्तम मार्ग आहेत.
स्वतःचे शौचालय स्वच्छ करणाऱ्यांकडे तुच्छतेने पाहिले जाते. म्हणून मी त्यांना सांगेन आम्ही आमचे काम स्वत:करतो.
शौचालयाच्या स्वच्छतेच्या आसपासचा सामाजिक कलंक श्रीमंत कुटुंबांमध्ये उद्धटपणाला कारणीभूत ठरतो आणि फूट निर्माण करतो, असे ते सांगतात.
'माझी मुलं खूप जिज्ञासू आहेत. ते निरीक्षण करतात आणि त्यांना खूप प्रश्न पडतात. मी त्यांना सांगेन की बघा, कोणीही आपल्यापेक्षा कमी नाही,' असे ते म्हणाले.
मुलांनी समाजात नम्रता आणि निष्पक्ष असे त्यांना वाटते. त्यांनी व्यक्तींच्या विशेषाधिकारांना गृहित धरुन समानतेच्या भावनेने जीवन जगावे असे ते सांगतात.