ऑल्ड मॉन्क रम कित्येक वर्षांपासून भारतात लोकप्रिय आहे. 1954 पासून या रमचे अनेक चाहते आहेत.
ऑल्ड मॉन्क रमबरोबरच तिची बॉटलदेखील तितकीच आकर्षक आहे. अनेकजण ही बॉटल सांभाळून ठेवतात. पण तुम्हाला माहितीये का ऑल्ड मॉन्कच्या बॉटलवर कोणाचा चेहरा आहे.
मोहन मीकिन लिमिटेड ओल्ड मॉन्क या कंपनीने या रमची निर्मिती केली आहे. या कंपनीच्या निर्मात्याचे नाव कर्नल वेद रतन आहे. ते माजी राज्यसभा खासदार, लखनऊचे माजी महापौर आणि सेन्सर बोर्डचे चेअरमन होते.
रम लाँच करण्यापूर्वी ते युरोप येथे गेले होते. इथं त्यांनी बेनेडिक्टिन संताची (Benedictine Monks) जीवनशैली आणि मद्य बनवण्याची प्रक्रिया पाहिली.
असं म्हणतात की, बेनेडिक्टिन संताच्या सन्मानाप्रीतर्थ वेद रतन मोहन यांनी या रमचे नाव ओल्ड मॉन्क असं ठेवलं
तर, ऑल्ड मॉन्कच्या बॉटलवर छापलेला तो चेहरा एचजी मीकिन यांचा आहे. एचजी यांनी मोहन यांच्यासोबत भागीदारीत दारूची फॅक्ट्री खरेदी केली होती.
कंपनीच्या नावातही दोघांचे नाव आहे. पण काही जणांच्या मतानुसार, ऑल्ड मॉन्कच्या बॉटलवर बेवेडिक्टिन संताचा चेहरा आहे.