प्रत्येकाला वाटतं की आपण भरपूर पैसा कमवावा. पण हे एवढं सोप्प नसतं. अनेकजण नोकरी करतात. पण नोकरीमध्ये पैसा कमवण्याच्या काही मर्यादा असतात.

जर तुम्हीसुद्धा नोकरी करत असाल आणि तुम्हालाही जास्त पैसे कमवायचे असतील तर नोकरी करतात करता पैसे कमण्याच्या कल्पना नक्की जाणून घ्या

एंजल इन्वेस्टमेंट

सध्या स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढत आहे. बरेच लोक स्टार्टअप सुरू करण्यासाठी पैसे गोळा करू शकत नाहीत. अशा लोकांच्या व्यवसायात पैसे गुंतवून तुम्ही एंजल इन्वेस्टमेंट करुन तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.

मित्र आणि नातेवाईकांना कर्ज

तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैशांची गरज असते, त्यासाठी ते बँकेकडे वळतात. जर तुम्हाला खात्री असेल की हा मित्र किंवा नातेवाईक वेळेवर पूर्ण रक्कम परत करू शकतो, तर तुम्ही त्यांना कर्ज देऊ शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता.

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड

जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये रस असेल तर निष्क्रिय उत्पन्न मिळविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही काही संशोधन करून चांगले शेअर्स निवडू शकता आणि त्यात पैसे गुंतवू शकता. तुम्हाला चांगले शेअर्स निवडता आले तर तुम्हाला आणखी नफा मिळू शकतो.

संगीत किंवा चित्रपट रॉयल्टी

तुम्ही संगीत किंवा चित्रपट रॉयल्टीमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. उत्पन्न मिळविण्याचा हा देखील एक अनोखा मार्ग आहे. यासाठी अनेक कलाकार त्यांच्या भविष्यातील रॉयल्टीचा काही भाग गुंतवणूकदारांना विकतात. तुम्हाला फक्त असे लोक शोधावे लागतील

ई-बुक लिहिणे आणि विकणे

जर तुम्हाला लेखनाची आवड असेल तर तुम्ही ई-बुक लिहून ते विकू शकता. एकदा तुमचे ई-बुक तयार झाले की ते तुम्हाला वर्षानुवर्षे पैसे कमवू शकता. उत्पन्न मिळविण्याची ही पद्धत केवळ लेखनाची आवड असलेल्यांसाठीच फायदेशीर ठरू शकते.

VIEW ALL

Read Next Story