पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंची भेट घेतली. रेकॉर्डब्रेक 29 पदकांसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळचा एक व्हिडिओ पीएम मोदी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पीएम मोदी पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नवदीप सिंहशी बोलताना दिसत आहेत.
यावेळी गोल्डन बॉय नवदीपने पीएम मोदी यांच्या डोक्यावर टोपी घालण्याची विनंती केली.
पीएम मोदी यांनी नवदीपची विनंती हसत-खेळत स्विकारली आणि लगेच जमिनीवर बसले. त्यानंतर नवदीपने त्यांच्या डोक्यावर आपली टोपी घातली.
इतकंच नाही तर नवदीपने आपल्या डाव्या हातावर स्वाक्षरी करण्याची विनंतीही केली. पीएम मोदी यांनी नवदीपची हि विनंतीही मान्य करत त्याच्या जॅकेटवर स्वाक्षरी केली.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. तब्बल 29 पदकं जिंकली. यात 7 सुवर्ण पदकं, 9 रौप्य पदकं आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे.
क्रीडा मंत्रालयाने देखील 43 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात पंतप्रधान पदक विजेत्या खेळाडूंचना शुभेच्छा देताना दिसातयत.