भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळाडू अनेकदा एकमेकांना टोपणनावाने हाक मारताना पाहायला मिळतात.
चाहते म्हणून आपल्याला खूप कमी क्रिकेटर्सची टोपणनावं माहित असतील. मात्र काही टोपणनावं ही फारच मजेशीर आहेत.
माजी गोलंदाज आशिष नेहरा याला सौरव गांगुलीने 'पोपट' हे टोपणनावं दिलं होतं.
विराट कोहली याला माजी कर्णधार एम एस धोनीने 'चिकू' हे नाव दिलं होतं.
कर्णधार रोहित शर्मा याला त्याचे टीममेट्स 'शाणा' आणि 'हिटमॅन' या नावाने हाक मारतात.
स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याला 'अज्जू' या टोपणनावाने हाक मारली जाते.
माजी गोलंदाज अनिल कुंबळे याला 'जम्बो' हे टोपणनावं दिलं होतं.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बालपणीचे मित्र त्याला 'तेंडल्या' या नावाने हाक मारत असत.
स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या याला 'हॅरी', 'कुंफू पंड्या' या नावाने ओळखले जाते.