किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसच्या प्रसिद्ध योजनांपैकी एक आहे. लोक मोठ्या प्रमाणात या योजनेत गुंतवणूक करत असतात.
जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर किसान विकास पत्र योजना एक चांगला पर्याय आहे.
जुलै ते सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी सरकार या योजनेत गुंतवल्या जाणाऱ्या रकमेवर 7.5 टक्क्यांचा व्याजदर देत आहे.
किसान विकास पत्र योजनेला गुंतवणूक दुप्पट करुन देणारी योजना म्हणूनही पाहिलं जातं. यामध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम 115 महिन्यात दुप्पट होईल.
पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्र योजनेत गुंतवणुकीतील रकमेवरीवल व्याज कम्पाऊंडिंगच्या आधारे मोजलं जातं.
किसान विकास पत्र योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता.
किसान विकास पत्रात अधिकाधिक गुंतवणुकीसाठी काही सीमा नाही. तुम्ही जॉइंट अकाऊंटच्या माध्यमातूनही या योजनेत गुंतवणूक करु शकता.
या योजनेंतर्गत अकाऊंट सुरु करण्यासाठी पोस्ट ऑफिसात तुम्हाला अर्ज भरावा लागेल. तसंच गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून भरावी लागेल.
किसान विकास पत्र एक छोटी बचत योजना आहे. सरकार दर तीन महिन्यांनी याच्या व्याजाचा आढावा घेत असतं आणि गरजेनुसार त्यात बदल केले जातात.