अभिनेता सलमान खानला धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई चर्चेत आलाय.
सलमान खानने काळे हरण मारुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे बिष्णोई समाजाचे म्हणणे आहे.
ध्रुव राठीने एक व्हिडीओ बनवून राजस्थानच्या अनिल बिष्णोई यांना काळ्या हरणांचे खरे रक्षक म्हटले आहे.
अनिल बिष्णोई कोण आहे? जाणून घेऊया.
राजस्थानच्या अलिगढ जिल्ह्यात राहणाऱ्या अनिल बिष्णोई यांनी काळ्या हरणांच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलंय.
मागच्या 35 वर्षात त्यांनी 10 हजारहून अधिक हरणांचे जीव वाचवले. 50 वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी आपलं अभियान राबवलं आणि लोकांना जागरुक केलं.
काळ्या हरणांसाठी त्यांनी 200 हून अधिक गुन्हे दाखल केले. ज्यात 24 हून अधिक केसेसमध्ये दोषींना शिक्षा सुनावण्यात आली.
60 गावांमध्ये पाणवठे तयार करुन हरणांची तहान भागवली.
काँलेज वयात त्यांनी एक कॉन्फरन्स ऐकली होती. ज्यानंतर त्यांना याविषयावर काम करण्याची प्रेरणा मिळाली.
समाज आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित करायला हवं, असे अनिल बिष्णोई सांगतात.
सुरुवातील त्यांच्यासोबत कमी लोकं होते, पण आता 3000 हून अधिक स्वयंसेवक त्यांच्यासोबत आहेत.