सर्वांची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीये. अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे.
शेकडो वर्षांची प्रतिक्षा आता संपुष्टात येणार असल्याने अनेकांनी राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तिकीट देखील बुक केलंय.
मात्र, पंतप्रधान मोदींनी अयोध्येत येऊ नये, असं आवाहन केलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी राम मंदिर कधी खुलं होणार? असा सवाल विचारला जात होता.
अशातच आता श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती देताना तारीख जाहीर केली आहे.
राम मंदिर 23 तारखेपासून सर्वांसाठी खुल्ले असेल अशी माहिती चंपत राय यांनी दिली. सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्रतिष्ठापणा मंदिरात होईल. गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी, मोहन भागवत,योगी आदित्यनाथ आणि सर्व ट्रस्टी उपस्थित असतील.
मात्र, येत्या 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद असेल. १६ जानेवारीपासून अयोध्येत विविध विधींना सुरुवात झाल्याची माहिती चंपत राय यांनी दिली.