पोलीस खात्यात भरती व्हायचं असेल तर 'या' 5 चुका कधीच करु नका

अनेक तरुण-तरुणींचं पोलीस खात्यात भरती होण्याचं स्वप्नं असतं. अंगावर खाकी वर्दी आल्यानंतर येणारा रुबाबच तसा वेगळा असतो.

दरवर्षी लाखो उमेदवार पोलीस होण्याच्या हेतूने परीक्षा देत असतात. यातील काहींचं स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं अपूर्ण राहतं.

जर तुमचीही पोलीस व्हायची इच्छा असेल तर 5 चुका कधीच करु नका. अन्यथा पोलीस होणं अशक्य आहे.

परीक्षेचा अभ्यास करताना पेपरही सोडवा. अनेक तरुण तोंडी परीक्षेची तयारीच करत नाहीत. पण तुम्ही अशी चूक करु नका.

जर आपण मोजके धावलो तरी निवडले जाऊ असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचा फिटनेस उत्तम असणं गरजेचं आहे.

6 वर्षांपूर्वी आलेला पेपर सोडवून पॅटर्न नेमका कसा असेल याचा अंदाज घ्या. पण त्यावर अवलंबून राहू नका.

अनेक पुस्तकं एकाच वेळी वाचणं बंद करा. यामुळे डोक्यात स्पष्टता राहणार नाही. प्रत्येत विषयासाठी निवडलेल्या पुस्तकांचच वाचन करा.

शारिरीक आरोग्याकडेही लक्ष द्या

पोलीस भरतीचा अभ्यास करताना आपल्या शारिरीक आरोग्याकडेही लक्ष द्या. कारण पोलीस भरती होण्यासाठी तुम्हाला परीक्षा आणि मैदाना अशा दोन्ही ठिकाणी उत्तम कामगिरी करावी लागते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घ्या. असं झालं तर मग पोलीस भरती होणं अशक्य होईल.

VIEW ALL

Read Next Story