ओदिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बहुल भागांमध्ये खाण्यात येणाऱ्या लाल मुंग्यांच्या चटणीचा कोरोना विरोधातील उपचारात समावेश करण्याची सूचना करण्यात आली होती.
या लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचा समावेश असतो.
ज्या पानांवर मुंग्या असतात. ते पान तोडले जाते. यानंतर मुंग्यांची अंडी आणि पानाला चिकटलेल्या मुंग्या वाटून याचा टचणी तयार केले जाते.
झाडांच्या पानामध्ये ही लाल चटणी दिली जाते. अनेक पर्यटक देखील याचा आस्वाद घेतात.
ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय येथील आधिवासी लाल मुंग्या खातात.
चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, प्रोटिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, झिंक आणि लोह यांचा समावेश असतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर उपाय म्हणून करतात.
ही लाल मुग्यांची चटणी फक्त चविष्टच नाही तर पौष्टिक देखील आहे. लाल मुंग्यांची चटणी खाण्याचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे आहे