स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
स्टेट बँकेत देशभरामध्ये 8283 जागांसाठी भरती होणार आहे.
एसबीआयमधील ही भरती ज्युनिअर असोसिएट म्हणजेच क्लर्क पदासाठी केली जाणार आहे.
कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेला उमेदवार एसबीआयमधील या भरतीसाठी अर्ज करु शकतो.
एसबीआयच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर आहे.
एसबीआयच्या या क्लर्क भरतीची 100 गुणांची पूर्व परीक्षा जानेवारी 2024 मध्ये होणार आहे.
एसबीआय भरतीसाठीची मुख्य परीक्षा 200 गुणांची असून ती फेब्रुवारी 2024 मध्ये होईल.
एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच sbi.co.in वर यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळेल.