Coca Cola चा मोठा निर्णय! फक्त कोल्ड्रिंकच नाही तर चहाही विकणार

दिग्गज बेवरेज कंपनी कोका-कोला इंडियाने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.

कोका-कोला आता फक्त कोल्ड्रिंकच नाही तर चहाही विकणार आहे.

कंपनीने रेडी टू ड्रिंक बेवरेज सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. Honest Tea नावाने हे प्रोडक्ट त्यांनी लाँच केलं आहे.

Honest ची ब्रँडची मालकी कोका-कोलाची उपकंपनी ऑनेस्टजवळ आहे.

पीटीआयनुसार, कोका कोलाने आईस ग्रीन टी-साठी लक्ष्मी ग्रुपच्या दार्जिलिंग टी-स्टेट Makaibari सह करार केला आहे.

कोका कोला कंपनीची ऑनेस्ट टी दोन वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये मिळणार आहे. यामधील एक लिंबू तुळस आणु दुसरा मँगो फ्लेव्हर असेल.

कोलकातामधील आधारित लक्ष्मी ग्रुपनुसार, दार्जिलिंगमधील Makaibari चहाचा सर्वात मोठा मळा आहे.

ग्राहकांना बेवरेजमध्ये पर्याय मिळावा यासाठी आपण चहा क्षेत्रात उतरल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

VIEW ALL

Read Next Story