कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती?

आयुर्वैदानुसार, सकाळी 10 ते रात्री 12 ही कलिंगड खाण्याची योग्य वेळ आहे. तसंच संध्याकाळी 5 च्या आधी खाऊ शकतो. पण रात्री कलिंगड खाऊ नका.

कलिंगड प्रमाणापेक्षा जास्त खाणंही धोक्याचं

दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कलिंगड नेहमीच गरजेपुरता खाल्ला पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास तुम्हाला ब्लोटिंग, गॅस अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच जेवताना कलिंगड खाऊ नका.

बॅक्टेरिया निर्माण होण्याची भीती

याशिवाय कापलेल्या कलिंगडमध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याची जास्त भीती असते. त्यामुळे तो कापल्यानंतर एखाद्या बंद डब्यात ठेवणं जास्त योग्य असतं.

पोषक तत्वं संपतात

असं सांगितलं जातं की, कलिंगड फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्यातील पोषक घटक हळूहळू संपू सांगतात. तसंच त्याच्या चवीतही फरक पडतो.

कलिंगड फ्रीजमध्ये का ठेवू नये?

फ्रिजमध्ये ठेवल्याने अनेक पदार्थ खराब होण्यापासून वाचवले जाऊ शकतात पण कलिंगडाच्या बाबतीत मात्र असं नाही.

कलिंगड फ्रिजमध्ये ठेवणं धोक्याचं

पण अनेकदा आपण कलिंगड कापल्यानंतर उरलेलं कलिंगड फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवशी खातो. तुम्हालाही अशी सवय असेल तर ही धोकादायक ठरु शकते.

कलिंगड आरोग्यासाठी चांगलं

कलिंगड खाल्ल्याने तहान, थकवा, शऱिरातील गर्मी, ब्लॅडर इंफेक्शन अशा अनेक गोष्टींपासून दिलासा मिळतो.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात कलिंगड खाणं आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असतं जे तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवतं आणि तुमच्या शरिरातील पाण्याची कमतरता भरुन काढतं.

कलिंगडची मागणी

उन्हाळ्यातील उकाडा प्रचंड वाढला असल्याने कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story