तामिळनाडूमधील कुन्नूर हे एक अतिशय प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. चहाच्या बागांसह, तुम्ही निलगिरी रेल्वे मार्गावर फिरू शकता. इथल्या रिसॉर्टमध्ये बसून बाहेरचं नजारा पाहणं सुद्धा मनमोहक आहेत.
पश्चिम बंगालमधील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या मिरिक या हिल स्टेशनला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सहलीचे काही दिवस घालवू शकता. उन्हाळ्यात या ठिकाणचे तापमान 20 अंशाच्या वर कधीही जात नाही.
उत्तराखंडमधील प्रमुख हिल स्टेशनपैकी एक असलेल्या राणीखेतचा इंग्रजांनी नक्कीच विकास केला असला तरी येथील सौंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. हिमालयाच्या टेकड्या आणि पाइन जंगलांचे विहंगम दृश्य या ठिकाणाला खास बनवते.
ऊटी हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इथले उंच डोंगर आणि हिरवेगार नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. इथली थंड हवा पर्यटकांना आकर्षित करते.
सुंदर आणि मनमोहक नैसर्गिक दृश्य पाहायचे असतील तर एकदा गंगटोकला भेट द्यावी लागेल. हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांवर वसलेले हे सुंदर शहर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.
तवांगला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते. प्राचीन मंदिरे आणि मठांचे हे स्थान दलाई लामांचे जन्मस्थान देखील आहे. आध्यात्मिक सौंदर्याचा हा संगम तुम्हाला इतर कुठल्याही ठिकाणी सापडणार नाही.
दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. हे भारतातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक आहे. पीर पंजाल आणि धौलाधार पर्वतरांगांचे विहंगम दृश्य, हिरव्यागार खोऱ्यातील नैसर्गिक वातावरण पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतात.